मुख्य सामग्रीवर वगळा

MDM agreement

*शालेय पोषण आहार योजना करारपत्र ( स्टँप पेपरसाठी )*


शालेय पोषण आहार योजना सन २०१६-१७
स्वयंपाकी नेमणूक करारपत्र
संदर्भ :- १) केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना २००६
 २) केंद्रशासन आदेश क्र.F.NO.१-१/२००९ – DESK (MDM )दि.२४/११/२००९
 ३) केंद्रशासन आदेश क्र. F.NO.३-५/२०१०– DESK (MDM )दि.२९/०४/२०१०
 ४) शिक्षण संचालक (प्राथ)यांचे पत्र क्र.शा.पो.आ./सु.यो./२०१०-११/प्राशिस/३०३/३४०९/ दि.१९/१०/२०१०
 ५) शासन निर्णय क्र.शापोआ २०१०/प्र.क्र.१८/ प्राशि/ दि.२/२/२०११
 ६) मा.शिक्षणाधिकारी (प्राथ)......यांचेकडील पत्र दि.०२/०४/२०१०


वरील संदर्भीय आदेशान्वये शाळा व्यवस्थापन समिती– -------------यांचेमार्फत श्री/श्रीमती ------------यांची सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात स्वयंपाकी म्हणून नेमणूक खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यात आली आहे. सदर करार हा मानधनावर नेमणूक केलेले स्वयंपाकी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यात झाला असल्याने नेमून दिलेले काम समाधानकारकरित्या करत नसेल तर संबधितांची नेमणूक रद्द करण्याचा शाळा व्यवस्थापन समितीस अधिकार राहील.
१. अन्न शिजवण्याचे काम करणे .
२. तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे .
३. विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप जेवणाच्या जागेवर करणे.
४. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर साफसफाई करणे (स्वयंपाकगृहासह)
 तसेच सांडलेल्या  अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे.
५. भांड्यांची साफसफाई करणे व जेवल्यानंतर ताटांची स्वच्छता करणे .
६. पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर पाणी पुरवणे .
 ७. शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे.
 ८. अन्न शिजवणा-या यंत्रणेच्या आहारविषयक नोंदी ठेवणे.(बचत गट अथवा स्वयंसेवी संस्थेसाठी लागू .)
 ९. अन्न शिजवून देताना स्वच्छता राखणे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.
 १०. स्वयंपाकगृह अथवा शालेय परिसर येथे  कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारची शारीरिक अथवा मानसिक इजा    झाल्यास त्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती अथवा शालेय व्यवस्थापन यांची राहणार नाही .
११.सदर करार हा १० महिन्यांसाठी असल्याने नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्याचा कोणताही शासकीय सेवेच्या सलगतेसाठी हक्क राहणार नाही. आर्थिक वर्ष संपताच सदर करार आपोआप रद्द समजला जाईल.
     करार करून देणारे  
         नाव व सही                      
      करार करून घेणारे

सचिव                       अध्यक्ष
    शाळा व्यवस्थापन समिती
  -----------------------------
साक्षीदार – १. ---------------  -------------------
२. -------------------------- -----------

टिप्पण्या

  1. सर मला प्रश्न पडला की न्यायालयात न्याय खरे का सरकार काय आहे हा प्रकार मात्र आरोपी फरार ते पण अटक आरोपींन माहिती असून.सदर हे घटना उल्हासनगर ०१ नंबर पोलिस स्टेशन मध्ये दिनांक २१/०१/२०१३ रोजीची F i r नंबर i23/2013 आणि दिनांक २२/०१/२०१३ आणि दिनांक २३/०१/२०१३ रोजीची पोलीस रिपोर्ट जावक नंबर दोन ४७१ आणि ४९८ असेच दोन कोर्ट केस नंबर उल्हासनगर ०३ चोपडा कोर्ट केस नंबर आर सी सी १०००४७७(४७७) या खटल्यातील फरार आरोपी बाबत शासन मान्य आपले सरकार पोर्टल ऑनलाईन तक्रारी मध्ये कोर्ट केस नंबर ४४७ नोंद दिसून येत असल्याने फरार आरोपी हे अटक आरोपींना माहिती असून आजतागायत पोलीस अपयशी.सदर या संदर्भात भरपूर प्रयत्न केले मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही.लोकशाही संदर्भातुन स्थानिक पत्रकार परिषद आणि मिडिया तुन आमरण उपोषणाला बसण्याची निवेदन देण्यात आले होते

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :- # कार्यक्रम पत्रिका:- उदा. व्याख्यान आगतम् स्वागतम् सुस्वागतम् 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पूजन/द...