मुख्य सामग्रीवर वगळा

गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे यांचे वाचन प्रेरणा विषयी विचार


वाचन ..... इतरांचे विचार आत्मसात करून आपल्या मनाला दिशा देण्याचे सर्वात स्वस्त व सहज उपलब्ध होणारे साधन आहे . अतिशय कमी वेळेत इतरांच्या विचारांचा खजिना आपल्याला उपलब्ध होतो .आपले सर्व आयुष्य खर्ची टाकून स्वतःचे अनुभव इतरांसाठी खुले करण्याचा अनेक लेखकांनी प्रयत्न केला आहे . त्यांच्या अनुभवांचा खजिना  पुढच्या पिढीसाठी उपलब्ध करून दिला आहे .थोर विचारवंतांचा विचार केला तर प्रत्येकावर कोणत्या ना कोणत्या पुस्तकातील विचारांचा प्रभाव दिसून येतो . म्हणून आपले विचार बदलण्यास चांगल्या पुस्तकांचा खूप उपयोग होतो . मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेत दिशा देण्याचे काम चांगली पुस्तके खूप मदत करतात . म्हणूनच म्हणतात की दिवसभरात थोडे का होईना वाचन केले पाहिजे . वाचाल तर वाचाल ! आपल्या ज्ञानाला नवी झळाळी देण्याचे काम वाचन करते . आणि सर्वांत महत्वाचे आपल्या मनाचा मोठेपणा आणि विचारांची खोली वाढविण्याचे काम वाचन करते . आपल्यापेक्षा विश्वात ज्ञानाचा खूप मोठा साठा आहे हे वाचनामुळे लक्षात येते . अहंभाव गळून पडण्यास मदत होते . इतरांचे मोठेपण , त्याग , संघर्ष , यश याबाबींची प्रचिती वाचना मुळे येते . जीवनाला एक आशादायी , प्रेरणादायी दिशा देण्याचे काम वाचन करते . फक्त गरज आहे वाचनातून मिळालेल्या चांगल्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याची !!                     वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन विशेष- (६ डिसेंबर २०१७) सामान्यतः सर्व समाज अगर माणसे कालप्रवाहाप्रमाणे वाहत जाण्यात धन्यता मानतात आणि यातच आपला मोठेपणा सिद्ध करण्...