मुख्य सामग्रीवर वगळा

MCSC

💎 💎 राज्यसेवा परीक्षा किंवा एमपीएससी 💎 💎

► केंद्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेप्रमाणेच राज्याराज्यांमध्येही अशाच अधिकारीपदाच्या परीक्षा घेतल्या जातात.
► उपजिल्हाधिकारी,
► पोलीस उपअधीक्षक,
► साहाय्यक पोलीस आयुक्त,
► तहसीलदार,
► मंत्रालयातील कक्ष अधिकारी,
► सहकार तालुका उपनिबंधक,
► जिल्हा उपनिबंधक,
► विभागीय सहनिबंधक,
► महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवा,
► साहाय्यक विक्रीकर आयुक्त,
► उपमुख्य कार्यकारी अधिकारी,
► गटविकास अधिकारी,
► राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक,
► साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
► अशा विविध पदांसाठी राज्य लोकसेवा आयोग परीक्षा घेतो.
► महाराष्ट्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे या परीक्षा घेतल्या जातात. केंद्रीय परीक्षांच्या तुलनेत या परीक्षेचा केंद्रबिंदू महाराष्ट्र राज्य व भारत इतका मर्यादित असतो. तर आयएएससाठी हाच केंद्रबिंदू भारत व इतर राष्ट्रे असा असतो.

💎 💎 परीक्षापद्धती

► या परीक्षा राज्यसेवा म्हणून ओळखल्या जातात. येथे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असाच क्रम असतो.
► येथे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षा बहुपर्यायी पद्धतीच्या असतात.
► पूर्वपरीक्षेत दोन प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात.
► प्रत्येकी २०० गुण आणि दोन तास. येथे निगेटिव्ह मार्किंग पद्धती असते. थोडक्यात, उत्तर चुकल्यास मिळविलेल्या गुणांपैकी गुण वजा होणे.
► पहिला पेपर सामान्य ज्ञानाचा तर दुसरा कलपरीक्षण चाचणी अर्थात अ‍ॅप्टिटय़ूडचा.

► सामान्य ज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये राज्य व राष्ट्रीयदृष्टय़ा महत्त्वाच्या अशा राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी,
► भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने) व भारताची स्वातंत्र्य चळवळ,
► महाराष्ट्र-भारत आणि जगाचा भूगोल,
► राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शासनपद्धती,
► राज्यघटना,
► आर्थिक जगातील घडामोडी,
► अर्थव्यवस्था,
► पर्यावरण,
► परिसंस्था आणि वातावरणीय बदल आदींविषयी प्रश्न विचारले जातात.
► २०० गुणांसाठी एकूण १०० प्रश्न असतात. त्यामुळे वेळ पुरेसा असतो आणि प्रश्नपत्रिका वाचून सहज पूर्ण होऊ शकते.

► कलपरीक्षण चाचणीमध्ये आकलन,
► उताऱ्यावरील प्रश्न,
► बुद्धिमापन चाचणी,
► गणिते,
► आकडेमोड,
► नकाशा किंवा आलेखावरील प्रश्न,
► निर्णयक्षमता तपासणारे प्रश्न अशा अनेक बाबींचा समावेश असतो.
► येथे ८० प्रश्न असतात. मात्र उतारे बऱ्यापैकी क्लिष्ट असल्यामुळे वाचनासाठी वेळ पुरत नाही. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा देताना या बाबी लक्षात ठेवून वाचन वेग वाढविण्याचा सराव करावा.

► या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षा असते.
► येथे प्रत्येकी १५० गुणांचे सामान्य ज्ञानाचे चार पेपर असतात.
► पहिला इतिहास व भूगोल.
► दुसरा भारतीय राज्यघटना व भारतीय राजकारण.
► तिसरा मानव संसाधन विकास व मानवी हक्क,
► चौथा अर्थव्यवस्था, नियोजन, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान. असे हे चार पेपर.
► सर्व प्रश्नपत्रिका १५० प्रश्नांच्या व दोन तास वेळेत सोडविण्याच्या असतात.
► त्याच्याबरोबरीनेच अनिवार्य इंग्रजी व मराठी भाषेचे पेपर असतात. दोन्ही भाषांचे पेपर प्रत्येकी १०० गुणांचे प्रत्येकी तीन तासांचे व दीर्घोत्तरी व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात.
या सर्व विषयांचा अभ्यासक्रम राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
► एकूण मुख्य परीक्षा ८०० गुणांची असते.

► त्यानंतर मुलाखत ही १०० गुणांची असते. मुख्य परीक्षा व मुलाखत यांच्या एकत्रित गुणांमधून अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना गुण धरले जातात.

► या सर्व प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी माध्यमातून असतात.
► राज्य लोकसेवा आयोगातर्फे परीक्षेनंतर काही दिवसांतच आदर्श उत्तरतालिका जाहीर करण्यात येते. त्यामध्ये उमेदवारांच्या काही सूचना असल्यास त्यांवर विचार करून काही दिवसांनी अंतिम उत्तरे प्रसिद्ध केली जातात. शिवाय प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान आपल्याला आपल्याच उत्तरपत्रिकेची (बहुपर्यायी असल्यामुळे एकच पान असलेली) कार्बन प्रत मिळते. त्यामुळे आयोगाने जाहीर केलेली उत्तरे, पुढील टप्प्यासाठी निर्धारित केलेली पात्रता गुणसंख्या आणि आपले गुण यांच्यात तफावत आल्यास आपल्याला पारदर्शी पद्धतीने खातरजमा करता येते.
► ही सुविधा केंद्रीय लोकसेवा आयोग देत नाही.

MPSC व स्पर्धा परीक्षा साठी अतिशय उपयुक्त !
मित्रांनो, मला स्पर्धा परीक्षेच्या तयारीत spardhamantra या App चा फायदा होतोय. यावर लोकराज्य, दिनविशेष, नोकरी संदर्भात जाहिराती, स्पर्धा परीक्षेची तयारी, सराव परीक्षा, वेळ चाचणी, आणखी बरेच काही आहे. हे App तुम्हीही नक्की वापरा व तुमच्या मित्रांना पण सांगा नक्की फायदा होईल.spardhamantra हे Mobile App play store वरून download करा. किंवा https://play.google.com/store/apps/details?id=com.technopro.upsc या link वरुन download करु शकता.

Facebbok ला जाऊन spardha mantra हे Page आपण Like करा.किंवा https://www.facebook.com/spardhamantra.in/ या link वरुन Like करु शकता. ज्यामुळे आपल्याला रोज आपले जनरल नॉलेज अपडेट ठेवता येईल.MPSC व स्पर्धा परीक्षा साठी अतिशय उपयुक्त !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

♿♿ *अपंग (दिव्यांग) व्यक्ति अधिकार कायदा - २०१६* ♿

🙏🏻🙏🏻 *काही महत्वाची कलमे...!* 🙏🏻🙏🏻 *# कलम ३ (१)* दिव्यांग व्यक्तींना समानता, सन्मान, आदर, सचोटी विषयी हक्क इतरांप्रमाणे बजावता येईल. हि सुयोग्य शासनाची जबाबदारी असेल. *# कलम ४ (१)* द...

वाक्प्रचार इयत्ता चौथी

विषय : मराठी ( बालभारती) वाक्प्रचार संग्रह *२.बोलणारी नदी* १) युक्ती सुचणे - कल्पना सुचणे. २)परवानगी मिळणे - संमती मिळणे, सवलत मिळणे, मोकळीक मिळणे. ३)शाळा बुडवणे - शाळेला न जाणे. ४)नवल...

प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :- # कार्यक्रम पत्रिका:- उदा. व्याख्यान आगतम् स्वागतम् सुस्वागतम् 1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण 2) सरस्वती पूजन/द...